पुन्हा एकदा कोयना अभयारण्याचा बेत ठरला. यावेळी आम्ही ४ जण होतो. मी, समीर,उदय आणि विशाल.
विशाल प्रथमच अभयारण्यामध्ये निघाला होता. तो जरा जास्त उत्साही दिसत होता.
मी आणि समीर भोर वरुन सातार्याला पोहोचलो. विशाल पुण्यावरुन आणि उदय कोरेगाववरुन आधीच पोहोचले होते.
आम्ही सामनाची खरेदी करायला निघालो. यावेळी थोडे चिकन किंवा मटण आणि केळी घेण्याचा प्लान होता. एखाद्या पानतळीच्या जागी हे पदार्थ ठेवून आजूबाजूला लपून बसून येणारे प्राणी पाहण्याचा प्लान होता.
चिकन, केळी आणि खाण्याचे साहित्या घेऊन आम्ही स्टॅंड वर आलो. २ च्या बामणोली गाडी मध्ये बसून आम्ही ४ ला बामणोली मध्ये पोहोचलो. शिवसागर जलाशया वर जाण्यास निघालो पण वाटेतच एका ने कुसापूरला जाणारी नाव गेल्याचे सांगितले. पुन्हा एकदा भैरवनाथ मंदिर मध्ये मुक्काम पडला. वसोट्याला जाण्यासाठी सकाळी अजुन २ गट आले . वन खात्याची रीतसर परवानगी घेऊन एका लॉंच ने वासोट्याच्या पायथ्याला पोहोचलो. २ त|सा चा जल प्रवास खूपच आल्हाददायक झाला.
आमच्या बरोबर चा ग्रूप वासोट्याला मुक्काम करणार होता. त्यामुळे आम्ही नागेश्वरला जाण्याचा निर्णय घेतला. वासोट्याच्या पायथ्याला उजव्या बाजूला असणार्या ओढ्या मधून सरळ गेल्यास नागेश्वरला पोहोचता येते. तिथेच आमचे स्वागत जलवा नि केले. काही जलवा डबी मध्ये भरून आम्ही ओढ्यातून पुढे निघालो. ओढ्यातून रस्ता असल्या मुळे मोठ मोठे दगड धोन्डे पार करत चालणे जरा अवघड जात होते. विशाल चे बूट तर सारखेच घसरत होते आणि तो सारखा पडत होता आणि त्याच्या पडण्याने सगळी शांतता भंग होत होती. आजूबाजूचे पक्षी, फुलपाखरे बघत बघत आम्ही पुढे सरकत होतो. मध्येच उदय ने सगळ्याना थांबायला सांगितले व एक पक्षी दाखवला... तो होता स्वर्गीय नर्तक. सुंदर पक्षी आपली एक फूट लांब शेपटी सांभाळत सांभाळत इकडे तिकडे उडत किडे पकडत होता. आम्ही पुढे निघालो. रस्त्या मध्ये आम्हाला भरपूर पक्षी दिसले, शेकरू दिसले. संध्याकाळी ६ च्या दरम्यान आम्ही नागेश्वरला पोहोचलो. येतानाच कुंडा मधून पाणी आणले होते. मसाले भात करण्याच्या तयारीला लागलो.. भात, पापड, लोणचे, चटणी कांदा एकदम मस्त जेवण झाले. गप्प मारत आणि दुसर्या दिवशी चे प्लॅनिंग करत झोपी गेलो. रात्री उंदीर अंगा वरुन गेल्याचे जाणवले. छतावर बर्याच पाली फिरत होत्या. त्या कायम तिथेच दिसतात.
सकाळी चहा, बिस्कीटे खाऊन आम्ही वासोट्याच्या पायथ्याला असणार्या जंगलामध्ये जाण्यास निघालो. बरोबर आणलेले चिकन आणि केळि घेतली. त्यांचा आज उपयोग करायचा होता. वासोट्या च्या वाटे वर आम्हाला काल चा ग्रूप भेटला. आज ते नागेश्वरला चालले.
चिकन आणि केळि पाणवठ्याच्या कडेला टाकून तिथेच लपून बसायचे असा प्लान होता. वासोट्याची वाट न धरता आम्ही डावी कडे जंगल| मध्ये घुसलो. काही वेळ चालल्यावर एक पाणवठा दिसला. आजूबाजूला झाडी आणि मध्येच मोकळी जागा होती. त्याच ठिकाणी बसायचा निर्णय घेतला. चिकन आणि केळी एकाच पिशवी मध्ये होते आणि त्यात भर म्हणून की काय पण साखर ही मिक्स झाली होती.. पिशवी उघडताच एकदम घाणेरडा वास सुटला. चिकन सडले होते केली त्यात कुसकरुन गेली होती आणि वरुन साखर पेरली होती. हा असा वास उदय ला पेढ्या सारखा वाटला. त्याला कसली ही घाण वाटली नाही सरळ पिशवी मध्ये हात घालून त्याने एक एक चिकन पेढा जंगल| मध्ये वाटायला सुरूवात केली म्हणजे इकडे तिकडे पसरायला सुरूवात केली. मग पाणवठयावर हात धुवून आम्ही आजूबाजूच्या झाडा वर स्थानापन्न झालो. १५-२० मी. शांत पणे गेली असतील तोच एक मून्गूस आमच्या समोरच्या झाडी तून बाहेर आले. आणि इकडे तिकडे फिरू लागले . पण त्याला चिकन चा वास येत नव्हता. वार्या ची दिशा ही मुंगुसा कडून आमच्या कडे होती आणि चिकन हे आमच्या दोघांच्या मध्ये होते त्यामुळे त्याला त्याचा वास आला नाही. थोडा वेळ इकडे तिकडे फिरून महाशय पुन्हा झाडी मध्ये अदृश्य झाले. आता झाडावर बसून आम्हाला जवळ जवळ एक तास झाला होता. हात पाय अवघडून आले. नीट बसता ही येत नव्हते. आमची हालचाल वाढली त्यामुळे तिथून निघायचा विचार केला. तिथून उतरून आम्ही पुन्हा नाल्याच्या दिशेने जाऊ लागलो ज्यातून काल नागेश्वरला गेलो होतो. वाटेमध्ये अतिशय घनदाट जंगल लागले. पूर्ण काळोखमय जंगल होते ते. तिथेच विशालला एक लाकुड सापडले ज्याच्या वर खूप सुंदर मशरूम उगवली होती. विशाल ने लाकूड बरोबर घेतले. काही वेळातच आम्ही नाल्यामध्ये उतरलो आणि नागेश्वर च्या दिशेने पुढे सरकू लागलो. तेवढ्यात आम्हाला कुत्र्याचे आवाज ऐकू येऊ लागले ... १०-१५ कुत्री आणि ४-५ लोक आम्हाला दिसले. हे लोक शिकारी साठी आले होते. आम्ही ओढ्यातून चाललो होतो. डाव्या बाजूच्या टेकडी वर कुत्री आणि माणसे एका मोठ्या दगडाखाली काही तरी पकडत होते. मी लगेच त्याच्या जवळ गेलो. ते लोक त्या दगडा लागत खडडा खणत होते. सगळी कुत्री त्या दगडाच्या आजूबाजूला बसली होती. तिथून समोर दिसणार्या डोंगारावरही काही माणसे दिसत होती. समोरचा डोंगर त्यानी व्यापून टाकला होता. आणि ते सगळे लोक हकारा देत होते. आणि त्यानी एकदम एका प्राण्याला उठवले. प्राणी सरळ समोरील टेकडी वरुन खाली यायला लागला . झाडी मुळे मला काही दिसेना पण झाडी तूटल्याचा आवाज मात्र खूप जोरजोरात येत होता.
थोड्यावेळात एक काळी आकृती समोरून पाळताना दिसली. ते एक झिपरे अस्वल होते. सगळे जण ओरडत होते डोलारा आला डोलारा आला. तेंव्हा कळाले की अस्वलला ते डोलारा म्हणतात. आणि असतेच ते तसे. डोंगरा वरुन मोठा दगड सोडावा तसे हा डोलारा झाडे झुडपे तोडत खाली येताना मला नीट दिसला.
काही वेळाने हाकार्याने त्या लोकानि पुन्हा एक सांबर उठवले. समीर,विशाल आणि उदय ही आता माझ्यापर्यंत पोहोचले होते. सांबर आमच्या समोर च्या टेकडीवर मोकळ्या जागे मध्ये आले होते. आता ते सगळ्याना दिसत होते. ते जसे सपाटीला आले की लगेच सगळ्या लोका नि हो हो हो हो असे ओरडाण्यास सुरूवात केली. सगळी कडून आवाज येत असल्याक|रणा ने त्या सांबराला कळेच ना कुठे पळायचे ते.. अगदी सममोहित झाल्या सारखे ते एकाच जागी उभे राहीले व इकडे तिकडे पाहु लागले . बंदुकवाला त्याला बंदुक सरसाऊन निघाला तोच त्याच्या बंदुकी च्या घोड्याला कारविची फांदी लागून दोन्ही गोळ्या उडाल्या आणि त्या सरशी सांबर दूर झाडी मध्ये दिसेनासे झाले. आम्हाला हायसे वाटले .. शेवटी निसर्ग च आला आपल्या बाळाच्या मदतीला असा एक विचार मनात आला. पण दगडा खालच्या प्राण्याचे भाग्य इतके चांगले नव्हते. कुत्र्यानि त्याचा जीव घेतला होता . लोकानि त्याला बाहेर काढले लगेच त्याचे गाठोडे केले आणि चालते झाले.. ते एक पिसोरि हरण होते. आम्ही काहीही करू शकलो नाही त्या जिवा ला वाचवण्या साठी. चर्चा करत नागेश्वर ची वाट धरली. वाटेमध्ये एक कुत्रे बसले होते. त्याच्या पायाला जखम झाली होती त्यामुळे ते तिथेच बसून राहीले होते. त्याचे मालक आणि बाकीच्या कुत्र्या बरोबर त्याला चालता आले नाही त्यामुळे ते मागे राहीले होते. पण आमच्या मागे ते चालू लागले. त्याचा आणि आमचा वेग जुळला. आम्ही त्याला घेऊन नागेश्वरला पोहोचलो .
दुसर्या दिवशी घरी जाण्याचा बेत होता त्यामुळे आज रात्री ही जंगल| मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. जेवण झाल्या वर बॅटरी घेऊन आम्ही गुहेच्या बाहेर पडलो. थोडेच पुढे गेलो असेल समोरच्या झाडा वर डोळे चमकले. तो एक रातावा होता. थोडे पुढे गेल्या वर पुन्हा डोळे चमकले. डोळ्यामधील अंतर जास्त होते. त्यामुळे तो एखादा मोठा प्राणी असावा म्हणून हळू हळु पुढे जाऊ लागलो. तो एक गवा होता. झाडपाला खात असताना त्याने आमच्या कडे पण नजर ठेवली होती. थोडा वेळाने तो निघून गेला आणि आम्ही पुढे झालो. थोडे पुढे गेल्या वर वाटेमध्ये एक सांबर दिसले. कुंडा कडे जाण्या साठी निघालो. तिथे दिसले काहीच नाही फक्त झाडी मधून प्राणी चालण्याचा आवाज तेवढा येत होता. आम्ही गुहे कडे परतलो.
सकाळी लवकर उठून आम्ही परतिचा प्रवास सुरू केला. वाटे मध्ये शेकरू शिवाय काहीही दिसलें नाही.
हनुमान मंदिर परिसरा मध्ये थोडे फोटो सेशन झाले आणि आम्ही शिवसागर जलाशाया वर पोहोचलो . वाटेत एक तस्कर जाती चा साप ही दिसला. थोडावेळ पाण्या मध्ये पोहून घेतले आणि मॅगी करायला घेतली. तेवढ्यात नाववाला आला. तयार मॅगी न|वेमध्येच खाण्याचा निर्णय झाला. घरी परतण्याचा प्रवास सुरू झाला होता . रात्री ८ ला मी समीर आणि उदय भोरला पोहोचलो. विशाल सातार्या वरुनच पुण्याची गाडी पकडली होती. आमच्या बरोबर नागेश्वरला आलेले कुत्रे आम्ही लॉंच मधून बामणोली ला आणून सोडले होते.
या ट्रेक मध्ये गमतीदार प्रसंग खूप घडले.
सगेळ विशाल शी निगडीत होते. उदय आणि माझे बरेच मनोरंजन झाले. याच ट्रेक मध्ये नवनवीन म्हणीचा शोध लागला. उदाहरणार्थ "ऐकवे जनाचे आणि करावे चुकीचे"
विशाल ने घेतलेल्या मशरूम च्या काठीचा ही चांगला किस्सा आहे.
पण वाईट हेच की या कोयना अभयारण्यामध्ये अजुन ही दिवसाढवल्या शिकार चालत होती आणि ती ही इतक्या मोठ्या प्रमाणात. वनअधिकार्याना सगळी माहिती देऊन आम्ही घरी पोहोचलो होतो.
mast lihila ahes blogs ani photos tar awesome ahet :)
ReplyDeleteNilesh Yaar.Nice yaar
ReplyDeleteNilya.. Leka zakasach kam kele ahes .. all the best.
ReplyDelete